आनंद आणि आशीर्वाद
आनंद
आणि आशीर्वाद
कोरोना विषाणूच्या भीतीमुळे बंद असलेली मंदिरं सुरु झाली. याचा
तेजोमयीच्या आईस खूप आनंद झाला. मंदिरं
बंद होण्याआधी ती दर मंगळवारी उद्यान गणेशाच्या दर्शनाला जायची. मंदिरं
सुरु झाल्याचं कळताच, आता
पुन्हा दर्शनाला जाण्याचं तिन बाबांना सांगितलं.
वा छान.. आपण
सगळेच जाऊ या ना..बाबा
म्हणाले.
तू येशील ना गं..आईने
तेजोमयीला विचारलं..
यावर काय उत्तर द्यावं, हे
तेजोमयीस कळेना. कारण
जिथे दोघे,तिथे
गर्दी,असं
तिने वाचलं होतं. सध्या
गर्दी न करण्याचा
काळ…आपण
कशाला त्यात हातभार लावायचा, असा
विचार तिच्या मनात आला. तो
तिने चाचरत बाबांना सांगितला..
त्यांना तिचं म्हणणं पटलं. तेजोमयी
मंदिरात आली नाही तर चालणार नाही का, त्यांनी
आईला विचारलं.आईनं
थोड्याशा नाखुषिनेच होकार दिला..
मंगळवारी आईबाबा सकाळीच मंदिरात जाण्यासाठी निघाले. बाबांनी
मुखपट्टी घातली. आईने
घातली नाही.
अगं,तू
मुखपट्टी लावून जा..तेजोमयी
म्हणाली.
मंदिरात कुठे लावायची असते का, बाप्पांना
ते आवडेल का…
त्यांना कां नाही आवडणार..भक्तांचं
रक्षण करणं हे तर त्यांचं मुख्य काम..जे
भक्त स्वत:ची
योग्य काळजी घेतात, ते
बाप्पांना अधिक आवडतात....तेजोमयी
म्हणाली.
बरं मॅडम, हे
सगळं तुम्हाला कुणी सांगितलं..आईने
विचारलं.
खुद्द बाप्पाच, मला
काल स्वप्नात येऊन सांगून गेले..
थापा नको मारुस..आई
लटक्या रागाने म्हणाली.
आई, ही
काही थाप नाही.तू
गणेशालाच दर्शनानंतर विचारुन घे ना..म्हणजे
मग दूध का दूध आणि मोदक का मोदक..
अगं कसली ही तुकबंदी..
मंदिरात गेल्यावर दोघांनीही मुखपट्टी काढायची नाही.
अगं, पण
अथर्वशीर्ष कसं म्हणणार..
मुखपट्टीच्या आत म्हणाना..
ते बाप्पांना कसं कळणार..
त्यांना सगळं कळत बाबा..ते
सर्व समर्थ असल्याचं तुम्हीच मला सांगता ना..
आणखी काय आदेश आहेत मॅडम आपले..आई
गमतिनं म्हणाली..
सोबत सॅनिटायझर ने..इकडे
तिकडे हात लागला तर लगेच सॅनिटायझरने स्वच्छ कर. देव्हाऱ्यासमोरच्या
कठड्यावर डोकं ठेऊ नकोस. मूषक
स्वामीच्या कानात,तेजोमयीला
चांगलं उत्तीर्ण होऊ देउ असं सांगू नकोस..तेजोमयी
एका दमात बोलली..
आजीबाई, हे
सगळं करायचं नाही तर मग मंदिरात जायचच कशाला..आई
म्हणाली..
वा s व
ते तर फारच उत्तम ..असं
तेजोमयीस बोलावस वाटलं…पण
यामुळे आई रागवेल हे लक्षात आल्यानं,ती
काही क्षण काहीच बोलली नाही.पण
लगेच आईच्या डोळयात थेट बघत ती म्हणाली,
तसं नाही गं..मंदिरात
जायचं नाही असं मी म्हणतेय का..नाही
ना…मंदिरात
आनंद आणि आर्शीवादासाठी जातो,असं
तूच सांगतेस नेहमी...मग
या आनंदाचा विचका कोरोना विषाणूने करु नये असं वाटलं म्हणून बोलले..
बाळ, तू
अगदी माझ्या मनातलंस बोललीस..बाबा
म्हणाले. मी
सुध्दा जाऊ नये असं वाटतय आता..काय
गं,चालेल
ना तुला..आईकडे
बघून बाबा म्हणाले.आईलाही
त्यांचं म्हणणं पटलं.तिने
होकारार्थी मान हलवली.
तेजोयमीने आईला मुखपट्टी आणून दिली.. आईला
टॅक्सी करुन देण्यासाठी बाबा तिच्यासोबत खाली उतरु लागले..तोच
तेजोमयीला काहीतरी आठवलं आणि ती वस्तू आणण्यासाठी मागे वळली..बघते
तर काय, अलेक्झांडर
ती वस्तू तोंडात घेऊन उभा. तिघानांही
आश्चर्य वाटलं. अलेक्झांडरच्या
शहाणपणाचं कौतुकही वाटलं.. ती
वस्तू होती सॅनिटायझरची बॉटल..
बघ आई.. तुला
आता अलेक्झांडरचं ऐकावचं लागेल आणि सॅनिटाझर लावावचं लागेल..तेजोमयी
आईकडे बघत म्हणाली..
तेजो मॅडम आणि अलेक्झांडर सरांचं सांगणं ऐकलं नाही तर बाप्पा रागवणार नाही का मला..आई
हसत म्हणाली आणि अलेक्झांडरने तोंडात धरलेली सॅनिटायझरची बॉटल घेऊन पर्समध्ये टाकली…
सुरेश
वांदिले
Comments
Post a Comment