"अमेरिकेची"तोडफोड
" अमेरिकेची " तोडफोड कल्याणीच्या घरी एक छान गुबगुबित मांजर आहे. कुणी तिला अमी म्हणतं.कुणी अमू नावानं हाक मारतं तर कुणी अमिटली-फिमुटली म्हणून लाड करतं. कुणी ॲमी असं म्हणून बोलवत असत. तिचं नेमकं नाव तरी काय असा प्रश्न एकदा कल्याणीच्या घरी आलेला तिचा मावस भाऊ शरदाला पडला. तेव्हा मांजरीच्या नामकरणाची गोष्ट कल्याणिने त्याला सांगितली. ही मांजर बाबांना त्यांच्या मित्राने दिली. बाबांनी जेव्हा तिला घरी आणली तेव्हा ते अगदीच एक दिवसाचं पिल्लू होतं. त्याला खाऊपिऊ घातल्यावर ते दुसऱ्या दिवशीपर्यंचत छान मस्ती करायला लागलं. एके दिवशी सकाळी सकाळी सगळेजण न्याहारी करत असताना, बाबा म्हणाले आपण या पिल्लूचं काहीतरी नाव ठेवलं पाहिजे. आईसुध्दा तशीच म्हणाली. बाबांनी कल्याणीस एखादं नाव सुचवावयास सांगितलं. कल्याणीने थोडावेळ विचार केला आणि ती म्हणाली, हिचं नाव आपण अमेरिका ठेऊ या का ? आई हसली. बाबाही हसले. तुम्हा दोघांना हसायला काय झालं ? कल्याणीने दोघांकडे किंचित नाराज होत विचारलं. अगं वेडाबाई, असं काही नाव असतं का प्राण्यांचं ? बाबा म्हणाले. का नाही असू शकत..कल्याणिने प्रतिप्रश...