Posts

हत्तीशी मैत्री

Image
  हत्तीशी मैत्री कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता. त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळ तो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरली आणि त्याला विचारलं... कावळोबा सकाळपासून बघतेय, तुझं चित्त काही थाऱ्यावर दिसत नाही. कसला विचार करतोस इतका ? कावळोबाने बराच वेळ काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा आई त्याला रागावून म्हणाली ... कावळोबा तू मला सांगितलं नाही तर तुला आज जेवायलाच मिळणार नाही. जेवणाचं नाव आईच्या तोंडातून बाहेर पडल्यावर कावळोबांना भुकेची जाणीव झाली. सकाळपासून त्याने काहीही खाल्लं नव्हतं. त्यामुळे आईचे बोल कानावर पडताच पोटात कावळे ओरडायला लागल्याची त्याला जाणीव झाली. कावळोबाने लगबगीने डोळे उघडले आणि तो आई जवळ जाऊन बसला. काय झालं माझ्या राज्या ? सांगना मला.मी तुझी मदत करु शकेन की . आई कावळोबास म्हणाली. अगं आई, तसं काही खास कारण नाही पण. .. कावळोबा म्हणाला. पण काय ? मला सकाळपासून सारखं वाटतय की आपण हत्तीशी मैत्री करावी. तुझ्या स्वप्नात हत्ती आला होता की काय ? नाही गं आई.तसं काही झालं नाही.म...

वेगळी सफर,अनोखा आनंद

Image
  ( भाग दोन ) वेगळी सफर,अनोखा आनंद ( आपल्याच गावाच्या सफरीला निघालेल्या मित्रांना काय काय नवं दिसतं ? पुढे वाचा... ) वा S व   गाव/शहरांमध्ये ग्रंथालये असतात. सध्या आपण ग्रंथालयात जात नाही. पण पूर्वी मुलं ग्रंथालयात जायची. काही ग्रंथालयं तर पन्नास वर्षे किंवा शंभर वर्षे जुनी असतात. ही ग्रंथालयं जुनाट आणि आजच्या तुमच्या भाषेत कूल जरी वाटत नसली तरी काही क्षण तिथे थांबा. ग्रंथालय कधी सुरु होतं, ते बघा. संध्याकाळचा वेळ असेल तर मग संध्याकाळी ग्रंथालय सफरीसाठी जा. त्या ठिकाणी जुनी जुनी पुस्तकं, मोठी ग्रंथ, वर्तमानपत्रे बघून तुम्ही थक्क व्हाल. मुलांसाठी म्हणून खास पुस्तकांचा विभाग प्रत्येक ग्रंथालयात असतो. तो बघा. तुम्ही नावं सुध्दा ऐकली नसणार. अशी पुस्तकं बघून वॉ S व असं एकमुखी तुम्ही म्हणाल. या प्रवासात तुम्हास तुमच्या गाव/शहरात असणाऱ्या अनेक शाळा, महाविद्यालये दिसतील. पटांगणं दिसतील. सरकारची कार्यालये दिसतील. छोट्या गावात एकच बाजारपेठ असते. पण मोठ्या गावात/शहरात दोन- तीन बाजारपेठा किंवा त्यापेक्षाही अधिक असू शकतात. बाजारपेठा बघण्याचा आंनद काही और असतो. साधारण: सकाळी बाजा...

(भाग एक) वेगळी सफर,अनोखा आनंद

( भाग एक ) वेगळी सफर,अनोखा आनंद मित्रांनो, संपली ना परीक्षा. कसं वाटतय. छान ना. आता काय करायचं ठरवलं या सुट्यांमध्ये तुम्ही. धम्माल मौज-मस्ती तर होणारच. ती व्हायलाच हवी. नाही का ? दरवर्षी तुमचे आईबाबा या सुट्यांमध्ये थंड हवेच्या ठिकाणी किंवा मग मामा-मावशीच्या गावाला/शहरात नेतात. तुम्ही सुध्दा हट्ट करत असाल की. यंदा जरा एका वेगळ्या ठिकाणी जाऊया का ? तुम्ही म्हणाल याचा अर्थ काय बरं ? हे वेगळं ठिकाण कोणतं नि तिथे कोण नेणार बरं ? मित्रांनो, हे वेगळं ठिकाण तुम्हास ठाउुक असलेलं नि तुमच्या जवळचं आहे. तिथं नेण्यासाठी कुणाची गरज नाही. इतकं स्पष्ट केल्यावरही तुम्हास अजून कळलेलं नाही ना. चला तर, स्पष्टच सांगतो. तुमच्या परिचयाचं नि तुम्हास ठाऊक असलेलं ठिकाण म्हणजे तुम्ही सध्या राहत असेललं गाव किंवा शहर. फुस्स की फर्स्ट क्लास फुस्स. डोंगर पोखरला नि निघाला काय तर पिटुकला उंदिर. अशीच काहीशी प्रतिक्रिया बऱ्याच मित्रांची राहू शकते. पण मित्रांनो, फुस्स करु नका की हुश्श करु नका. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे स्वत:ला विचारा की तुम्ही इतकी वर्षे, ज्या गावात/शहरात राहता, ते तुम्हास कितपत ठाऊक आ...

पर्वत पडला

Image
  पर्वत पडला पर्वताला स्वत:च्या ताकदिचा खूप अभिमान होता. आपणास कुणीही आपल्या स्थानावरुन हटवू शकत नाही, असं त्याला वाटायचं. हा अहंकार मनात बाळगूनच तो पर्वतावरील झाडांसोबत, त्या झाडांवर राहणाऱ्या पक्ष्यांसोबत , प्राण्यांसोबत, आकाशातील ढगांसोबत आणि वाऱ्यासोबत वागायचा. तो सर्वांना तुच्छ समजायचा. वाऱ्याने त्याला अनेकदा समजावलं. त्याला सांगितलं की तुझ्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या वृक्षवल्लींमुळे तुझा पाया मजबूत झाला आहे. या वृक्षवल्लींच्या अवतीभोवती राहणाऱ्या पशुपक्ष्यांमुळे हे सतत फुलत राहते. त्याचे रक्षण होते. ते तसे राहिल्याने तुझ्या अंगाखांद्यावर असणारी वृक्षवल्ली कायम टिकून राहते. त्यामुळे तुही टिकून राहतो.. मात्र आपल्या शक्तीचा गर्व झालेल्या पर्वतास वाऱ्याचे हे म्हणणे पटले नाही. उलट तो वाऱ्यालाच अव्दातव्दा बोलला. त्याचा अपमान केला. या अहंकारी पर्वतास चांगला धडा शिकवायला हवा, असे वाऱ्याने मनोमन ठरवलं. त्याला धडा शिकवायचा म्हणजे त्याला या ठिकाणाहून हलवून दुसऱ्या ठिकाणी ढकलून द्यायचं. ते तसं कठीण काम होतं. कारण वृक्षवल्लींच्या मुळांमुळे त्याचा पाया भक्कम होता. या वृक्षवल्ली...

लाल यादी

Image
  लाल यादी बऱ्याच दिवसांनी कॉलनीतल्या टोळीतील तेजोमयी,कल्याणी,वैष्णवी,प्रदीप,टिंकू,चिंकू,श्रीकांतही मंडळी मारुतीरायाच्या मंदिरात गोळा झाली. या टोळीला मारुतीराया नेहमीच हसतमूख वाटायचे. अरे या या,तुम्ही आलात ते बरं झालं खूप आनंद झाला, वगैरे ते बोलण्याचा आणि गदा हलवून आशीर्वाद देण्याचा भास तेजोमयीला व्हायचा. हा भास खरच असल्याच सगळया टोळीचं एकमत होतं. त्यामुळे मारुतीरायांनी गदा हलवून आशीर्वाद दिला असं तेजोमयीनं सांगितलं की टोळी मग मंदिरातल्या बाकांवर बसून गप्पा-टप्पा करायला मोकळी. पण आज मारुतीरायांसमोर एक मिनिटे उभे राहूनही, त्यांची गदा हलण्याचा भास तेजोमयीस झाला नाही.त्यामुळे ती काहीच बोलेना. त्यामुळे टोळीसही हालता येईना. अगं काय झालं ? मारुतीरायांनी आशीर्वाद दिला नाही का ? कल्याणीनं विचारलं. तेजोमयीनं नकारार्थी मान हलवली.म्हणजे ते रागावले की काय ? प्रदीप म्हणाला. पण,ते आपल्यावर कशासाठी रागावतील बॉ,आपण तर काहीच केलं नाही ? टिल्लू म्हणाला. काय हो मारुतीराया तुम्ही आमच्यावर रागावलात की काय ? श्रीकांतच्या तोंडून निघूनच गेलं. सर्वांनी आधी त्याच्याकडे आणि नंतर मारुतीरायां...

ताप...

Image
  ताप... सार्थक आणि अवनीश या दोघांनांही आईसक्रीम खूप आवडतं. इतर कोणताही हट्ट पुरवता येत नसेल तर सार्थक आणि अवनीशचे बाबा त्या दोघांनांही आईसक्रीम पार्लरमध्ये घेऊन जाणार, त्यांच्या आवडीचे आईसक्रीम घेऊन देणार..दोघांचंही समाधान झालच म्हणून समजा. सार्थक आणि अनिकेत हे दोघे चुलत भाऊ. सार्थक वरच्या मजल्यावर राहतो तर अनिकेत खालच्या मजल्यावर. त्यांच्या घरी पाहुणे आले की सकाळची न्याहरी सार्थककडे तर दुपारचे भोजन अवनीशकडे, अशी विभागणी व्हायची. त्यावेळी वरचे आणि खालचे एकत्रच पाहुण्यांसोबत जेवायला बसत असत. पाहुणे आले की सार्थक आणि अवनीशची चंगळ. पाहुण्यांसाठी गोडधोड, आईसक्रीम असं सारं काही होत असे. त्यामुळे घरी पाहुणे येतात कधी, याची ते दोघेही कायम वाट बघायचे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे त्यांच्याकडे कुणी आल नव्हतं. हळूहळू करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं दिसल्यावर डिसेंबरमध्ये सार्थक आणि अवनीशकडे मुंबईचे पाहुणे आले. पाहुणे म्हणजे सार्थक आणि अवनीशची आत्या. आत्या येताना दोघांसाठी वेगवेगळी खेळणी आणि खूप सारा खाऊ घेऊन यायची, त्यामुळे सार्थक आणि अवनीश आत्यावर खुष असत. आत्या आल्य...