Posts

आजीची खेळणी...

Image
    आजीची खेळणी... बरेच दिवासांनी आजी तेजोमयीच्या घरी आली. तेजोमयीस खूप आनंद झाला. ती आजीची फार लाडकी. आजीजवळ गोष्टींचा खूप मोठा खजिना. खाऊ आणि हा खजिना   आजी तिच्यासाठीच राखून ठेवायची. आजीने दारात पाऊल टाकताच, तेजोमयीनं तिला मिठी मारली. आजीने तिचे गालगुच्चे घेतले. अलेक्झांडर ( द डॉगी ) घरी आल्यावर आजी पहिल्यांदाच घरी येत होती. त्यामुळे त्याने आजीला बघितले नव्हते. आजीने घरात पाऊल टाकत असताना त्याने गुरगुरायला सुरुवात केली. तेव्हा आईने त्याच्याकडे बघून डोळे वटारले. शांत राहा असा इशारा केला. आईचा इषारा त्याला बरोबर कळतो. तो लगेच शांत झाला. आजीकडून होणारे तेजोमयीचं लाड बघून त्याच्या हे लक्षात आलंच होतं की, घरी आलेली व्यक्ती खास   आहे. आईने जेव्हा आजीला वाकून नमस्कार केला तेव्हा तर त्याची खात्रीच पटली. त्यानेही त्याच्या पध्दतीने आजीच्या जवळ जाऊन नमस्कार केला. त्याचं कौतुक करायचं सोडून आजीने त्याला हाडहूड केलं. कोण गं हा, इथे काय करतोय. नवा कुत्रा दिसतो तुमचा... आजी किंचित चढया आवाजात म्हणाली. अगं आई हा अलेक्झांडर. आमचा शेपुटवाला दोस्त..बाबा म्हणाले.. माझा मु...

कॅक्टस ?

Image
  कॅक्टस ? गॅलरितील बागेमध्ये तेजोमयीच्या आईने मोठ्या प्रेमाने ब्रम्हकमळ लावलं होतं. या झाडास फुल आलं की आई त्याविषयी आजूबाजूच्यांना, नातेवाईकांना उत्साहाने साग्रसंगीत सांगायची. कळी आल्यापासून ते कळीचं रुपांतर पूर्ण फुलात होईपर्यंत आईचं ब्रम्हकमळय होऊन जाणं हे नित्याचचं झालं होतं. याचं आताशा बाबा आणि तेजोमयीस फारच नवलं राहिलं नव्हतं. मात्र काही महिन्यांपासून आईच्या ब्रम्हकमळ साग्रसंगीत उत्सवात अलेक्झांडर ( द डॉगी ) चा समावेश झाला होता. यावर्षी तोही ब्रम्हकमळमय होऊन गेला. यंदा आईने कळी आली त्या दिवसापासून दररोज व्हीडियो चित्रिकरण केलं. त्यामुळे कळीची वाढ, पूर्ण उमलेलं फुल असा प्रत्येक टप्पा, चित्रित झाला. हा यंदासाठी आईचा नवा आनंद होता. या आनंदात परवा एक मीठाचा खडा पडला. तिच्या चुलत बहिणीने, ब्रम्हकमळाविषयी एका व्हॉटसॲप ग्रुपवर आलेली माहिती पाठवली. त्यात म्हंटलं होतं की अनेकांच्या घरी असतो तो खरा ब्रम्हकमळ नाहीच्च मुळी. तो एक प्रकारचा कॅक्टस आहे. खरा ब्रम्हकमळ फक्त हिमालयातच एके ठिकाणी उगवतो.. आईने ती माहिती जोराने वाचून दाखवली. मग आई, तू आता काय करणार ? तेजोमयीनं वि...

पुस्तक वाचण्याचा कंटाळा

Image
  पुस्तक वाचण्याचा कंटाळा पुस्तक वाचण्याचा जाम कंटाळा यायचा तेजोमयीला. पुस्तकं म्हंटली की तिचं असायचं, नो वे...स्वप्नात सुध्दा तिला पुस्तक दिसलं की ती स्वप्नावर काट मारायची. स्वप्नातल्या परीशी कट्टी घ्यायची. थेट, अट्टी कट्टी गोरगोटी लिंबाचा पाला हलू नको पर्यंत ती पोहचायची. परीराणी हिरमुसली व्हायची.   व्हाट इज धिस..तेजोमयी ..ती कधी रागाने म्हणायची.   तर , कोंबडिका पिस , म्हणून तेजोमयी खोखो हसत सुटायची..   परीराणीला सूचेना की या बयेला पुस्तक आवडावित म्हणून काय करावं बरं..जी मुलं पुस्तक वाचतात..तीच परीस आवडायची.   एकदा परीला खूप तहान लागली. तेव्हा इतर मुलांनी तिला थंडगार पाणी दिलं..पण तेजोमयीनं मात्र पियुष दिलं..तेव्हा पासून ती तिला खूप आवडायला लागली. एकदा तर तेजोमयीनं तिला रसना देऊन , आय लव्ह यू असंही म्हटलं..तेव्हा पासून तर परीने तिच्या स्वप्नात जाण्याचा एकही दिवस चुकवला नाही.   हळूहळू तेजोमयीचं मन वळवू अशी तिला खात्री होती. पण तेजोमयी मात्र ढिम्म. पुस्तकं म्हंटल की ती थेट , सेडना, या दहाव्या ग्रहावरच पोहचायची. तिथून तिला परत आणनं परीराणीला ...
Image
  ट्रास्कैडेकाफोबिया तेजोमयीचे १२ पर्यंतचे पाढे पटापट पाठ झाले. तेराचा पाढ मात्र पाठ होण्याचे नावच घेईना. त्यामुळे तिला पाढे पाठ करण्याचा कंटाळा आला. तिची गाडी तेरावरच अडकली. हा तेरा आकडा काळ्या मांजरीचा सारखाच दिसतो. आडवा गेलाय मला. तेजोमयी बोलून गेली. काय गं एकटीच कुणाशी बोलतेस तू... कोण तुला आडवा गेला म्हणालीस. बाबांनी विचारलं. तेव्हा तेजोमयीने तेरा आडवा गेल्याच सांगितलं. बाबा , यावर मनमुराद हसले. अगं तेरा आकडा , म्हणजे एखादा प्राणी आहे की काय , आडवा जायला..आणि समजा तो आडवा गेला म्हणून तुझी पाढे पांठातर गाडी , पंक्चर झाली का ? हो ना हो बाबा , १२ पर्यंतचे पाढे कसे पटापट पाठ झाले. पण १३ ने मात्र नाकी नऊ आणले.. बाबा हा १३ नंबर अशूभ असतो , असं एकदा मी वाचलं होतं. तसं तर झालं नसेल. अगं बाई , निर्जीव असणारा १३ आकडा कसा काय अशूभ राहू शकतो. खर तर कोणताच आकडा अशूभ राहू शकत नाही. पण काही देशांमध्ये १३ आकड्यास चांगलं समजत नाही. त्यामुळे त्या देशात १३ क्रमांकाच्या खोल्या नसतात. १३ क्रमांकाचे आसन नसते. विमानात १३ क्रमांकाची ओळ नसते. १३ तारखेला शुक्रवार आला नि त्या दिवशी एखाद्या...

साशा आणि पायपर

Image
साशा आणि पायपर साशा आणि पायपर यांची गोष्ट तुम्हास माहीत आहे का ? काहिंनी ठाऊक असू शकते तर काहींना नाही. तर साशा म्हणजे मी आणि पायपर म्हणजे तो. हे मी आणि तो कोण ? असा प्रश्न तुम्हाला पडला असणार. तर मी साशा आणि तो पायपर..हा हा..हा..  तर आम्ही दोघेही राहतो सिंगापूरमध्ये. या देशातील मिस्टर एक्सवायझेड किंवा श्रीयूत अबक यांचे आम्ही दोघेही शेपूटवाले खास दोस्त. आम्ही दिसायला गोड-गोबरे-गोंडस-गोजिरवाणे आहोतच. त्यामुळे एक्झवायझेड यांचे खूप खूप लाडके सुध्दा. खा-प्या-मौजमस्ती करा. अशी आमची तिघांची दे धम्माल सुरु असते दररोज. आमचे मित्र एक्सवायझेड, आम्हा दोघांनांही नव्या फॅशनचे नवे कपडे घालायला देतात. बूट घालायला देतात. झक्कास अशी नेकटायही त्यांनी आणली आमच्यासाठी, परवाच. अहाहा, आमचा स्मार्टनेस कैकपटिने वाढला की ही नेकटाय घातल्यावर..एक्झवायझेडने तर चक्क आनंदानं उडीच मारली. त्याने आमच्या सोबत एक सेल्फी काढली. आता, सेल्फी मधील सेल्फचा अर्थ स्वत:साठी  असला तरी, त्या अर्थाकडे कोण लक्ष देतय म्हणा. तर आमचे मित्र एक्सवायझेड यांनी ही सेल्फी लगेच टाकली इंस्टाग्रॉमवर. अहो, चमत्कारच झाला...