निंदानालस्ती
निंदानालस्ती एका तलावाच्या काठी असलेल्या झाडाच्या आडोशाला अनेक पक्षी येत. दिवसभर त्यांची दंगामस्ती चाले. इकडून तिकडे उड्या मारायला या पक्षांना खूप आवडत असे. एकही पक्षी फार काळ एखाद्या ठिकाणी स्वस्थ बसत नसे. एका फांदीवरुन दुसऱ्या आणि दुसरीवरुन तिसऱ्या आणि मग लगेच पंख फैलावून आकाशात सूर मारणार, सभोवताली चक्कर मारली की पुन्हा झाडांच्या फांद्यावर येऊन बसणार. पुन्हा काही वेळाने हाच खेळ नव्याने सुरु. अशा या तलावाच्या ठिकाणी काही बगळे उडत उडत येत. तलावातली बसण्यासारखी एखादी जागा ते बघत आणि त्यावर तासनतास बसून राहत. क्वचितच ते या जागेवरुन त्या जागेवर जात किंवा काही दूर उडून येत. इतर पक्षांसारखं मात्र सारखे उडणे बसणे, पुन्हा उडणे असं काही ते करत नसत. इतर पक्षांना याचं फार आश्चर्य वाटायचं. एकदा पक्षांची सभा भरली .त्यात कावळा, पोपट, चिमणी, टिटवी, कोकीळ, कोकिळा, कबुतर, निळकंठ इत्यादी पक्षी होते. ते सर्वजण तलावतील एका जागेवर बसलेल्या बगळयाबद्दल चर्चा करु लागले. हा बगळोबा फारच आळशी दिसतो बुवा.कावळा म्हणाला. उडता येत असूनही फार उडत नाही. मख्ख बसून राहतो दिवसेंदिवस एकाच ठिकाणी....